रविवार, १४ एप्रिल, २०१३

शिवरायांचे खॊटारडे ब्रिगेडी भक्त.
सध्या फेसबुकवर ब्रिगेडी लोक शिवा तुझे नांव ठेविले पवित्र /छत्रपती सूत्र विश्वाचे हा अभंग संत तुकारामांनी शिवाजी महाराजांसाठी रचलेला आहे असे सांगून,शिवाजी महाराजांना छत्रपती ही उपाधी संत तुकारामांनी दिली असे सांगत आहेत.मी सम्पूर्ण गाथेत शोध घेतला.तुकाराम गाथेत शिवाजी महाराजांचे नांव असलेला एकही अभंग नाही.

शिवाजी महाराजांचे नांव समर्थ रामदास स्वामी या आणि या एकाच संताच्या साहित्यात येते.दुसर्या कुणाच्याही साहित्यात नाही.
शिवसमर्थ भॆट १०मे१६७८ रोजी झाल्याचे जयसिंगराव पवार याम्नी पान क्र.४१,प्रस्तावना,छ.संभाजी स्मारक ग्रंथ येथे लिहून ठेवलेआहे.या ग्रंथात सुरुवातीला खेडेकर,कोकाटे यांचे आभार मानलेले आहेत.
शिवाजी महाराज आणि संत तुकाराम यांच्या भेटीची निस्चित तारीख कुणी दिली आहे काय? आणखी एक संत तुकाराम गाथेतील ३०४०क्रमांकांचा अभंग समर्थांचा आहे असे सांगून समर्थांची बदनामी ब्रिगेडी लोक करत आहेत,कृपया सर्व ब्रिगेडविरोधकांनी हा अभंग अभंग क्रमांका सहित पाठ करून ठेवावा आणि जागोजागी त्याचा वापर ब्रिगेडच्या अपप्रचारास तोंड देण्यासाठी करावा:-
अभंग क्र.३०४०,तुकाराम गाथा:-
दुधाळ गाढवी जरी जाली पाहे । पावेल ते काय धेनुसरी ॥1॥
कागाचिया गळा पुष्पाचिया माळा । हंसाची तो कळा काय जाणे ॥ध्रु.॥
मर्कटें अंघोळी लावियेले टिळे । ब्राह्मणाचे लीळे वर्तूं नेणे ॥2॥
जरी तो ब्राह्मण जाला कर्मभ्रष्ट । तुका ह्मणे श्रेष्ठ तिहीं लोकीं ॥3॥
पुरावे नाहीत म्हणून महाराजांची संत तुकारामांशी भॆट झालीच नाही असे मात्र मी म्हणणार नाही.शिवाजी महाराज हे साधूसंतांचा आदर करणारे महापुरुष होते व त्यांना संतांसमोर झुकण्यात कसलीही लाज वाटत नव्हती.आजच्या ब्रिगेडींना शिवसमर्थांचे चित्र पाहून लाज वाटते पण बनावट अभंग संत तुकारामांच्या नावावर लावताना लाज वाटत ना्ही.

संत तुकाराम महाराज,समर्थ रामदास स्वामी आणि या दोघांना प्रणाम करताना छत्रपती शिवाजी महाराज.